PM kisan new Rules : पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधारकार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सततची नापिकी, किडींचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चांगले उत्पादन निघाले तरी पिकांना चांगला भाव मिळणार की नाही? हा प्रश्न असतो. खरीप व रब्बी हंगामाच्या पेरणीची ही चिंता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, ऐन अडचणीच्या वेळी मदत व्हावी, या उद्देशाने शासनाने पीएम किसान योजनेंतर्गत वर्षाला ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार शासनाने हप्ता जाहीर केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात रक्कमही जमा होते.
डिसेंबर २०१८ पासून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येत आहेत. योजना सुरू झाली तेव्हा एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांच्या नावावर शेती असणाऱ्यांनी ही अर्ज केले आहेत. मात्र, कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. PM kisan new Rules
केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजनेची नवी नियमावली
तुमच्या कुटुंबात पीएम किसानचे किती लाभार्थी?
पीएम किसान योजनेसाठी नवीन नियमावली लागू केली आहे. त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे किती लाभार्थी अपात्र होणार, याकडे लक्ष लागले आहे.
आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार!
नवीन नियमामुळे आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढले जाणार आहे. जे पात्र शेतकरी आहेत, त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान हप्त्याची प्रतीक्षा आहे. PM kisan new Rules
१९ वा हप्ता कधी?
PM kisan new Rules पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता निवडणुकीपूर्वी जाहीर झाला होता. आता १९व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे
२०१९ पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ
वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंद करावी लागणार आहे.
एकाच व्यक्तीला लाभ
कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेतून लाभ मिळेल. जे आयकर भरतात, पेन्शनर आहेत अशांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.
वारंवार केवायसी का करावी लागते?
एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही वारंवार ई- केवायसी करायला का सांगितले जाते? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. मात्र, ज्या शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खाते बंद पडले त्यांनाच केवायसी करावी लागते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.
अर्ज करताय? पत्नी, मुलांचे द्या आधार!
कुटुंबातील एकालाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधारकार्ड जोडावे लागणार आहे. या पडताळणी केल्यानंतरच लाभ मिळणार आहे. PM kisan new Rules
PM Kisan : पीएम किसान योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना नाही मिळणार, कारण पहा इथे Pm kisan 19th installment